कऱ्हाडच्या रेश्‍माताईंनी मंदीतही शोधली नवी संधी!

सचिन शिंदे
Thursday, 1 October 2020

रेश्‍मा चव्हाण या महिलेने आठवडाभर शिल्लक राहिलेल्या दुधापासून पेढे तयार करून चांगल्या पध्दतीने पॅकिंग करून ठेवले. त्यानंतर त्यांनी लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल झाल्यावर पेढे विकण्यास सुरुवात केली. महिनाभरात त्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी रेश्‍माताईंचा हा उपक्रम प्रेरणादायी असाच ठरलेला आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : लॉकडाउनमुळे सर्व व्यवसाय, उद्योग बंद झाले. त्यामुळे दुधाची मागणीही घटली. परिणामी, दूध मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिले. त्याचा विचार करून कोरोनासाठी मध्यंतरी हॉटस्पॉट बनलेल्या वनवासमाची येथील गृहलक्ष्मी महिला स्वयंसहायता समूहाच्या रेश्‍मा चव्हाण या कल्पक महिलेने आठवडाभर शिल्लक राहिलेल्या दुधापासून पेढे तयार करून ते विकले. मंदीतही त्यांनी संधी शोधून सुमारे 15 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. 

रेश्‍मा चव्हाण या महिलेने आठवडाभर शिल्लक राहिलेल्या दुधापासून पेढे तयार करून चांगल्या पध्दतीने पॅकिंग करून ठेवले. त्यानंतर त्यांनी लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल झाल्यावर पेढे विकण्यास सुरुवात केली. महिनाभरात त्यांना सुमारे 15 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी रेश्‍माताईंचा हा उपक्रम प्रेरणादायी असाच ठरलेला आहे. 

सकारात्मक विचार असेल, तर कोरोनाला हरवणे कठीण नाही : गिरीष शहा

या उपक्रमासाठी त्यांना तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, प्रकल्प संचालक अविनाश फडतरे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत थोरात, संगीता मोरे, स्वाती मोरे, जयवंत दळवी, नीलेश पवार, श्रीकांत कुंभारदरे, जयवंत ढाणे, प्रेरक वैशाली चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. लॉकडाउनमध्ये दूध शिल्लक राहिले. त्यामुळे घरीच पेढे तयार करण्याचे ठरवले. त्यानुसार ते तयार करून त्याची विक्री केली. त्यातून चांगले उत्पन्नही मिळाले असल्याचे रेश्‍मा चव्हाण यांनी सांगितले.
 
संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reshma Chavan Started A Business In Lockdown Satara News