कऱ्हाड - सोमवार पेठेतील एका अपार्टमेंटच्या बांधकाम परवानगीसाठी मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त होऊनही बिल्डरकडे १० लाखाची लाच मागून त्याला मागील तारखेच्या चलनावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या येथील पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना सुमारे पाच महिन्याने अटक झाली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सकाळी सातारा येथे कारवाई केली.