जावळीत तहसीलदार थेट बांधावर, पिकांच्या नुकसानीची पाहणी

विजय सपकाळ
Saturday, 17 October 2020

पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. मेढा, केळघर, कुसूंबी, बामणोली, करहरसह पश्‍चिम भागात प्रामुख्याने भात पिकासह नाचणी, हायब्रीड, भुईमूग, सोयाबीन पावसाने भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे पिकांच्या नुकसानीची माहिती तहसीलदार घाटगे यांनी शेतात जाऊन घेतली.

मेढा (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यात पावसामुळे भात, भुईमूग, सोयाबीन यांसह पिकांचे मोठे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर प्रभारी तहसीलदार मिलिंद घाटगे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी व पंचायत समितीमधील संबंधित यंत्रणेला दिले. 

पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. मेढा, केळघर, कुसूंबी, बामणोली, करहरसह पश्‍चिम भागात प्रामुख्याने भात पिकासह नाचणी, हायब्रीड, भुईमूग, सोयाबीन पावसाने भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे पिकांच्या नुकसानीची माहिती तहसीलदार घाटगे यांनी शेतात जाऊन घेतली. या वेळी गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी शेखर सिंह व प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या सूचनेनुसार जावळीतील प्रशासकीय यंत्रणेला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट पंचनामे करण्याचे आदेश नुकतेच तहसीलदार घाटगे यांनी दिले. 

माणला शेतकऱ्यांची धांदल; कांदा, बाजरीसह घेवड्याचे मोठे नुकसान

प्रांताधिकाऱ्यांची चिखल तुडवत पाहणी 

प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनीही जावळी तालुक्‍यातील काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अगदी चिखल तुडवत पाहणी करून तातडीने पंचनामे करून घेण्याच्या सूचना दिल्या. प्रांताधिकारी मुल्ला यांची शेतकऱ्यांविषयीची तळमळ पाहून शेतकरी हळहळले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rice And Soybean Crops Have Been Severely Damaged Due To Rains In Jawali Taluka Satara News