

International Driving Permit Requests Rise in Satara RTO
sakal
सातारा: नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी परदेशात जाणाऱ्यांमुळे आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा आंतरराष्ट्रीय परवान्यात वाढ झाली आहे. सातारा प्रादेशिक कार्यालयातून २०२४-२५ मध्ये तब्बल १३३ परवाने काढले गेले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय परवान्यात पुन्हा वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे.