अभिमानास्पद! सातारकर अमेरिकेला देणार 'हॅम रेडिओ'चे प्रशिक्षण

Ham Radio
Ham Radioesakal

सातारा : येथील 'हॅम' युवक आता अमेरिकेतील (America) युवक आणि नागरिकांना आपत्ती काळात संदेश वहनासाठी उपयोगी ठरणाऱ्या हॅम रेडिओचे (Ham Radio) प्रशिक्षण देणार आहेत. येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॅमच्या (Institute of Ham) रोहित भोसले (Rohit Bhosale) आणि शंतनू करांडे (Shantanu Karande) यांची अमेरिकेतील ग्रेटर लॉस एंजलिस अमेचर रेडिओ (Greater Los Angeles Amateur Radio Group) या संस्थेमध्ये प्रशिक्षकपदी निवड करण्यात झाली आहे. (Rohit Bhosale And Shantanu Karande From Satara Will Train American Citizens On Ham Radio)

Summary

नैसर्गिक आपत्तीप्रसंगी दूरसंचार यंत्रणा कोलमडण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यावेळी मदतकार्य मिळविण्यासाठी 'हॅम रेडिओ'ची मोठ्या प्रमाणात मदत होत असते.

नैसर्गिक आपत्तीप्रसंगी दूरसंचार यंत्रणा कोलमडण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यावेळी मदतकार्य मिळविण्यासाठी 'हॅम रेडिओ'ची मोठ्या प्रमाणात मदत होत असते. नुकतेच भारतामध्ये तौक्ते आणि यास चक्रीवादळाने धुमाकूळ घातला, तसेच जपानमध्ये (Japan) आलेली त्सुनामी असो की केरळमधील पूरपरिस्थिती, या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये 'हॅम रेडिओ' ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आपत्कालीन परिस्थितीत हॅम रेडिओच्या माध्यमातून एकमेकांना संपर्क साधून मदत मिळवता येते व मदत पोचवताही येते. हॅम रेडिओ अर्थात बॅटरीवर चालणाऱ्या छोट्या ट्रान्स रिसिव्हरच्या मदतीने स्थानिक तसेच जागतिक पातळीवरील हॅम यंत्रणा वापरणाऱ्यांशी संपर्क साधणे शक्य होते. सातारा इन्स्टिट्यूट ऑफ हॅमने जागतिक विज्ञानदिनी अजिंक्यताऱ्यावर विद्यार्थांना ‘हॅम रेडिओ'चे प्रात्यक्षिक तसेच आपत्तीप्रसंगी हॅम रेडिओचा होणारा उपयोग याची कार्यशाळा आयोजित केलेली होती.

Ham Radio
जिल्हाधिकाऱ्यांचे धरणग्रस्तांकडे दुर्लक्ष; वर्षभरात कोयना टास्क फोर्सची बैठकच नाही!

सातारा इन्स्टिट्यूट ऑफ हॅमच्या माध्यमातून हॅम ऑपरेटर शंतनू करांडे यांनी हवामानचा अचूक अंदाज बांधण्यासाठी नोआ सॅटेलाइट रेडिओ स्टेशन (NOAA Satellite Radio Station) सातारा येथे सुरू केलेले आहे. या माध्यमातून पाऊस, चक्रीवादळ याचा अचूक अंदाज बांधणे शक्य होत आहे. भारतामध्ये हॅम रेडिओधारकांची संख्या वाढवण्यासाठी सातारा इन्स्टिट्यूट ऑफ हॅमच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न सुरू आहेत. शाळा, महाविद्यालये येथे हॅम रेडिओ कार्यशाळेचे मोफत आयोजन केले जाते. त्यांच्या कार्याची दाखल घेत हॅम ऑपरेटर श्री. भोसले आणि करांडे यांची अमेरिकेतील ग्रेटर लॉस एंजलिस अमेचर रेडिओ या संस्थेमध्ये प्रशिक्षकपदी निवड करण्यात झाली असून, त्याचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले. यामुळे विद्यार्थांना भारतामध्ये राहून अमेरिकेन हॅम रेडिओ अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेऊन अमेरिकन हॅम रेडिओ लायसन्सची आंतरराष्ट्रीय परीक्षा देता येणार आहे, असे सातारा इन्स्टिट्यूट ऑफ हॅमच्या अध्यक्षा कोमल भोसले (Komal Bhosle) यांनी सांगितले.

Rohit Bhosale And Shantanu Karande From Satara Will Train American Citizens On Ham Radio

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com