
या सुळक्याच्या चारही बाजूस अंजनेरी, ब्रह्मगिरी पर्वत, तसेच हरिहरगड दिमाखात उभे असल्याची माहिती रोहितने दिली.
कोरेगाव (जि. सातारा) : राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधत कुमठे (ता. कोरेगाव) येथील रोहित जाधव या गिर्यारोहकाने पुण्यातील होमिओपॅथिक कन्सल्टंट डॉ. मनीषा सोनवणे यांच्या साथीने नाशिकमधील 300 फूट उंचीच्या, गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणाऱ्या नवरी सुळक्यावर चढाई करून तीन तासांच्या खडतर प्रयत्नांनंतर तो सर केला. या साहस वीरांनी कोरोनाच्या संकटात कामगिरी पार केलेल्या कोरोना योद्ध्यांना सलामी दिली. पॉइंट ब्रेक ऍडव्हेंचर ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली.
अग्रलेख : विखाराला बॅटीचे उत्तर
मूळचा कुमठे (ता. कोरेगाव) येथील रोहित शांताराम जाधव हा युवक नोकरीनिमित्त भोसरी येथे स्थायिक आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातही नोकरी सांभाळत रोहितने गिर्यारोहणाची आवड जोपासली असून, त्याने वजीर, लिंगाना यासारखे अवघड सुळके सर केले आहेत. डॉ. मनीषा सोनवणे यांनी याआधी लिंगाना, वजीर, डांग्या सुळका, तसेच हिमालयातील ट्रेक पूर्ण केले आहेत, तसेच त्यांनी उत्तराखंडमधील निम इन्स्टिट्यूटमधून माउंटेनेरिंगचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण पूर्ण केले असून, महाराष्ट्रातील महिला गिर्यारोहकांमध्ये त्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर रोहितने शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारा "नवरी' सुळका सर करण्याचे आव्हानात्मक उद्दिष्ट ठेवले होते. त्याने ते डॉ. सोनवणे यांच्या साथीने पूर्ण केले. रोहितने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकपासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या या सुळक्याच्या आजूबाजूला अंजनी, ब्रह्मगिरी पर्वत आहेत. या सुळक्याला जोडूनच आणखी एक सुळका असल्याने या दोन सुळक्यांना "नवरा- नवरी' सुळके असे संबोधले जाते.
सातारकरांनाे! बिनधास्त खा अंडी, चिकन; कुक्कुटपालकांसह पशुसंवर्धन दक्ष
मोहिमेविषयी रोहित म्हणाला, "हा सुळका सर करण्यासाठी सकाळी चढाई करण्यास सुरवात केली. सुळक्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी एक तास लागला. त्यानंतरच्या एका तासात सुळक्यावर चढाई केली आणि सुळका सर करण्यात यश आले. "चिमणी क्लाइंबिंग'द्वारे ही मोहीम पूर्ण केली. टेक्निकल सपोर्टसाठी पॉइंट ब्रेक ऍडवेंचर या संस्थेचे सदस्य उपस्थित होते. नाशिकमधील पीबीए ग्रुपने ही मोहीम आयोजिली होती. नवरी सुळक्याच्या माथ्यावर फक्त दोनच व्यक्ती उभ्या राहू शकतील एवढीच जागा आहे. तब्बल 300 फूट खडतर चढाई करून सुळक्यावर पोचल्यानंतर उतरताना पुन्हा 300 फूट "रॅपलिंग'चा थरार अनुभवायला मिळतो.'' या सुळक्याच्या चारही बाजूस अंजनेरी, ब्रह्मगिरी पर्वत, तसेच हरिहरगड दिमाखात उभे असल्याची माहिती रोहितने दिली.
बहिणीला बनवले मानलेल्या भावानेच मामा; उस्मानाबादी शेळ्या घेऊन पसार
Edited By : Siddharth Latkar