

सातारा : जकातवाडी (ता. सातारा) येथील वस्ताद नगरमध्ये जमिनीच्या अतिक्रमणावरून आज दुपारी दोन गटांत राडा झाला. याप्रकरणी १० जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून दांडकी जप्त करण्यात आली आहेत. यावेळी पोलिसांसमोरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याने पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. तणाव निवळण्यासाठी जकातवाडी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिस ठाण्यात सुरू होती.