कऱ्हाड - विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांचा झालेला पराभव या वयात त्यांच्या पचनी पडत नाही, असे दिसत आहे. बोगस मतांसंदर्भात ते भूमिका मांडत आहेत. विधानसभा निवडणुकीत पडल्यानंतर सात आठ महिन्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला आहे असा टोला लगावुन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लोकांनी दिलेला कौल स्विकारला पाहिजे, आपला पराभव का झाला याचे आत्मपरिक्षण केले पाहिजे असा सल्लाही त्यांना दिला.