
ढेबेवाडी :कुणी पिवळा पितांबर रंगवतंय, तर कुणी सोनेरी मुकुटासह डोळे अन् कानावर शेवटचा हात फिरवतंय, कुणी सिंहासन सजवतंय, तर कुणी मोर, सिंह, नागाच्या फण्याला आकार देतेय...गणेशोत्सव जवळ आल्याने परिसरात कारागिरांच्या घरी सकाळपासून सायंकाळपर्यंत अशी लगबग दृष्टीला पडत आहे. अलीकडे काही वर्षांपासून विभागात मूर्ती निर्मितीच्या कामात महिला कारागिरांची वाढलेली संख्या वेगळेपण ठरत आहे. यातून मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा कुंचल्यातून विविध रूपांतील बाप्पांना साकारताना मिळणारा आनंद खूप मोठा असल्याच्या प्रतिक्रिया कारागीर महिलांनी व्यक्त केल्या.