

Fired from Job, Commits Heist: ₹32 Lakh Jewellery Loot Shocks Satara
sakal
सातारा : पोवईनाका परिसरात रात्रीच्या सुमारास माेटारीतून आलेल्या पाच जणांनी अंगडिया कुरिअरच्या कर्मचाऱ्याकडे असणारे तीन सराफी पेढीचे वितळवलेले २१ तोळे वजनाचे, ३२ लाख चार हजार रुपये किमतीचे सोने लुटल्याची घटना घडली हाेती. त्याची तक्रार नोंद झाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी तपासासाठी पथके विविध भागांत तैनात केली हाेती. यापैकी एका पथकाने सोने लुटणाऱ्या टोळीला मध्य प्रदेशच्या सीमेवर धुळे जिल्ह्याच्या हद्दीतील शिरपूर येथून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांना रात्री उशिरा सातारा येथे आणण्यात आले.