MBBS Success Story: परिस्थिती आडवी आली, पण जिद्द जिंकली! डोंगरदऱ्यांतून डॉक्टरकीच्या शिखरावर; साहिलच्या एमबीबीएस यशाची प्रेरणादायी कहाणी..

Sahil Jadhav From Kandati Valley Becomes A Doctor: दुर्गम वलवण गावातून प्रतिकूल परिस्थितीला भिडत साहिल जाधवची एमबीबीएसपर्यंतची झेप; मेहनत, चिकाटी आणि पालकांच्या पाठबळातून कांदाटी खोऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support

MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support

esakal

Updated on

सातारा : दुर्गम भाग, मर्यादित सुविधा आणि खडतर परिस्थितीवर मात करत ध्येय गाठण्याची जिद्द असेल, तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते, हे कांदाटी खोऱ्यातील वलवण गावच्या साहिल जाधव याने सिद्ध केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत मेहनत, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर साहिलने एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी संपादन करून डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याच्या या यशामुळे जाधव परिवारासह संपूर्ण कांदाटी खोऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com