
-हेमंत पवार
कऱ्हाड : यशवंतनगर (ता. कऱ्हाड, जि सातारा) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. त्यासाठी सत्ताधारी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाला शह देण्यासाठी विरोधी कॉंग्रेस, भाजपसह सर्व पक्षीय नेत्यांनी मोट बांधली. उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत त्यांना त्यात यशही आले. सह्याद्री कारखान्याला बाजार समिती पॅटर्न वापरुन एकत्रीतपणे निवडणुक लढवण्याचे नेत्यांनी ठरवले.