
- सचिन शिंदे
कऱ्हाड : कोकण किनारपट्टीसह राधानगरीच्या पट्ट्यातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळ्या वाटांवर ४३ ठिकाणी संरक्षण कुटी आहेत. व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पाचही वन परिक्षेत्रात उभारलेल्या संरक्षणासाठी चार कोटींचा निधी मिळाला. त्यातून अद्ययावत संरक्षण कुटी झाल्या आहेत. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात श्वापदांच्या शिकारीही चोर वाटेने येणाऱ्या वृक्षतोडीवर कोकण किनार पट्टीतून येणाऱ्या पायवाटांसह चोरट्या वाटांवर वन्यजीवची करडी नजर आहे. वन्य जीव विभागाचा कर्मचारी त्या कुटीत २४ तास राहणार आहे. त्यांच्याकडे जीपीआरएस व अन्य अत्याधुनिक सुविधाही आहेत.