
Police action in Saidapur: 19 arrested in gambling raid, materials seized.
कऱ्हाड: सैदापूर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. त्यात १९ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन लाखांच्या सहा दुचाकींसह ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.