esakal | ...तर आरोग्य मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही; साजीद मुल्लांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

...तर आरोग्य मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही

हा निर्णय तात्काळ मागे नाही घेतला तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला.

...तर आरोग्य मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही

sakal_logo
By
- हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा): राज्य सरकारने आरोग्य सेविकांना कामावरुन कमी करण्याचा दिलेला आदेश बेकायदेशीर असून त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अॅड. अमर मुल्ला यांनी आश्वासन दिले. हा निर्णय तात्काळ मागे नाही घेतला तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला.

हेही वाचा: कऱ्हाड : उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरा- प्रहार संघटना

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करुनही कामावरुन कमी केलेल्या आरोग्य सेवकांची बैठक नुकतीच झाली. त्यामध्ये अॅड. मुल्ला, बळीराजा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष मुल्ला, शितल शिंदे, तब्बसूम मुल्ला, मंगल मुळीक, सविता रुपनर, रुक्मिणी साळुंखे आदींसह महिला उपस्थित होत्या. कोरोना काळात आरोग्य सेविकांनी स्वत:च्या कुटुंबाची काळजी न करता रुग्णांची सेवा केली. त्याचं फळ म्हणून राज्य सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना कमी करून अन्याय केला. त्यामुळे आरोग्य सेविकांना आत्महत्या करण्या शिवाय पर्याय राहणार नाही.

हेही वाचा: कऱ्हाड: सरपंच परिषदेची कार्यकारिणी जाहीर

या आरोग्य सेविकांनी अॅड. मुल्ला यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली. त्यावर अॅड. मुल्ला यांनी महाराष्ट्र सरकारचे आरोग्य सेविकांना कमी करण्याचा आदेश बेकायदेशीर असल्याचे सांगितले. या असंविधानीक आदेशाविरुध्द सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने या आरोग्य सेविकांना जाहीर पाठिंबा देण्यात आला असून हा निर्णय तात्काळ मागे नाही घेतला तर आरोग्य मंत्री टोपे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुल्ला यांनी सांगितले.

loading image
go to top