esakal | satara | सज्जनगड दर्शनासाठी भाविकांना खुला; दसऱ्यानंतर निवास व्यवस्था होणार सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

सज्जनगड

सज्जनगड दर्शनासाठी भाविकांना खुला; दसऱ्यानंतर निवास व्यवस्था होणार सुरू

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : सज्जनगड येथील समर्थांचे समाधिस्थान आणि समर्थस्थापित श्रीराम मंदिर सर्व भाविकांसाठी दर्शनाकरिता खुले करण्यात आले आहे. येणाऱ्या सर्व भाविकांना भोजन प्रसादही सुरू करण्यात आला आहे. मात्र, दसऱ्यानंतर २१ ऑक्टोबरपासून निवास व्यवस्था सुरू केली जाणार असल्याची माहिती रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांनी दिली. दरम्यान, गडावरील अशोकवनाच्या सुशोभीकरणाचे काम वेगात सुरू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर गेले सुमारे दीड वर्ष सज्जनगडावर दर्शन भाविकांसाठी बंद होते. दर्शनासाठी प्रशासनाने बंदी घातली होती. प्रशासनाने परवानगी देताच गडावरील समर्थ समाधी मंदिर व श्रीराम मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. गडावर दर्शनासाठी राज्यातून आणि परराज्यांतून दररोज शेकडो भाविक येत असतात. त्या सर्वांना संस्थानच्या वतीने भोजन प्रसाद दिला जातो. कोरोना काळात हा बंद ठेवण्यात आला होता. आता भाविकांना हा भोजन प्रसादही देण्यास पूर्वीप्रमाणे प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र, अद्याप निवास व्यवस्था सुरू करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: कर्मयोगी कारखाना सभासदांचे आर्थिक हित जोपासण्यास कटिबद्ध : हर्षवर्धन पाटील

याबाबत संस्थानचे अध्यक्ष स्वामी म्हणाले, ‘‘गेली दीड वर्ष निवास व्यवस्था बंद होती. त्यामुळे सर्व खोल्यांची स्वच्छता, सॅनिटायझिंग करणे गरजेचे होते. त्यामुळे निवास व्यवस्था आता २१ ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे. सर्व भाविकांनी याची नोद घ्यावी.’’

अशोकवनाचा होतोय कायापालट दरम्यान, सज्जनगड येथे संस्थानचा भोजन हॉल प्रशस्त आहे. मात्र, अनेक वेळा सलग सुट्या असल्या की तसेच शनिवारी-रविवारी तसेच दासनवमी, रामनवमी आणि प्रत्येक उत्सवावेळी भाविक हजारोंच्या संख्येने येतात. त्यांना भोजन देताना भोजन हॉल पुरेसा होत नाही. त्यामुळे भाविकांना अशोकवनात भोजनासाठी जमिनीवरच बसावे लागत होते. महिला, वृद्ध यांना बसण्यास अडचण होत होती. तेथे काही ठिकाणी मातीची जमीन होती. त्यामुळे अस्वच्छता जास्त होत होती. तसेच पाण्याचा निचरा होण्यातही अडचण येत होती. त्यामुळे कूपर इंडस्ट्रीजचे प्रमुख फरोख कूपर यांनी दिलेल्या २५ लाख रुपयांच्या देणगीतून अशोकवनाचे सुशोभीकरण केले जात आहे. तेथे सर्वत्र चांगली फरशी घालण्यात येत असून, भोजनासाठी टेबल आणि बाकांची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा, पाणी पिण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी व्यवस्था केली जात आहे. याचे काम सध्या गडावर वेगाने सुरू आहे, अशी माहिती श्री. स्वामी यांनी दिली.

loading image
go to top