
One-Stop Property Showcase: Sakal Expo Kicks Off in Satara
Sakal
सातारा: घर, फ्लॅट, प्लॉट किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेकांचे स्वप्न असते; पण योग्य पर्याय, योग्य ठिकाण व सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणे अवघड ठरते. ही अडचण लक्षात घेऊन ‘सकाळ’ माध्यम समूहाने साताऱ्यात ‘सकाळ प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ चे आयोजन केले आहे. हा दोन दिवसीय महोत्सव ११ व १२ ऑक्टोबर (शनिवार व रविवार) रोजी अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र येथे होणार आहे, तर बांधकाम क्षेत्रातील ‘कंग्राळकर असोसिएट्स’ या एक्स्पोचे मुख्य प्रायोजक आहेत.