''पुस्तके ही माणसाला विचार देतात; माणसांच्या जीवनाला दिशा देतात''

दिलीपकुमार चिंचकर
Friday, 19 February 2021

पुस्तके ही माणसाला विचार देतात. माणसांच्या जीवनाला दिशा देतात. त्यामुळे सर्व नागरिकांनी या ग्रंथोत्सवास भेट द्यावी असे आवाहन मंगेश बलशेटवार यांनी केेले आहे.

सातारा : पुस्तके असो नाही तर वृत्तपत्र. वाचक आणि समस्त पुस्तकप्रेमी नागरिकांना वाचनासाठी माहिती, ज्ञान दर्जेदारच देण्याची परंपरा "सकाळ'ने जपली आहे. सकाळ प्रकाशन आणि येथील बलशेटवार बुक सेलर्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या व विविध विषयांवरील पुस्तकांनी ओतप्रोत भरलेल्या या ग्रंथोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
 
दै. सकाळ आणि साताऱ्यातील बलशेटवार बुकसेलर्स यांच्या वतीने मोती चौक आणि पोवई नाक्‍यावरील बलशेटवार बुक सेलर्स येथे ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्‌घाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास बलशेटवार बुक सेलर्सचे संचालक मंगेश बलशेटवार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सकाळ प्रकाशनचे नदीम रावल, "सकाळ'चे सहयोगी संपादक राजेश सोळसकर, वरिष्ठ व्यवस्थापक राजेश निंबाळकर आणि साताऱ्यातील ग्रंथप्रेमी उपस्थित होते. आमदार भोसले म्हणाले, ""वाचकांना दर्जेदार देण्याची परंपरा "सकाळ'ने कायम जपली आहे. अनेक पिढ्यांतील नागरिक "सकाळ'चे वाचक आहेत. बलशेटवार बुक सेलर्स आणि सकाळ प्रकाशनने नागरिकांना दर्जेदार पुस्तकांची या ग्रंथोत्सवातून ज्ञान, माहिती मिळविण्याची पर्वणी दिली आहे. यावर्षी साताऱ्याचा ग्रंथमहोत्सव कोरोनामुळे होऊ शकला नाही. ती कसर सकाळ आणि बलशेटवार यांनी या ग्रंथोत्सवातून भरून काढली आहे. उत्तम आणि दर्जेदार पुस्तके या ग्रंथोत्सवात उपलब्ध आहेत. शिवाय नागरिकांना पुस्तक खरेदीवर भरघोस सवलत मिळणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या ग्रंथोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा.'' 

इथं काेणच डाॅन नाही, तडीपारांना कसा धडा शिकवायचा मला चांगलं माहितीये 

प्रारंभी आमदार भोसले यांनी ग्रंथांची पाहणी केली. मंगेश बलशेटवार यांनी आमदार भोसले यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. सकाळ प्रकाशनचे नदीम रावल यांनी आमदार भोसले यांना पुस्तके भेट दिली. त्या वेळी मंगेश बलशेटवार म्हणाले, ""पुस्तके ही माणसाला विचार देतात. माणसांच्या जीवनाला दिशा देतात. त्यामुळे सर्व नागरिकांनी या ग्रंथोत्सवास भेट द्यावी. पुस्तकांच्या खरेदीवर भरघोस सवलत दिली जाणार आहे. "सकाळ'ने हा ग्रंथोत्सव आयोजित करण्याची संधी दिल्याबद्धल आभारी आहे.'' "सकाळ'चे सहयोगी संपादक राजेश सोळसकर यांनी प्रास्ताविकात "सकाळ'च्या उपक्रमांची माहिती दिली. "सकाळ'चे वरिष्ठ व्यवस्थापक राजेश निंबाळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहर आणि परिसरातील नागरिक, मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, हा ग्रंथोत्सव पोवई नाका आणि मोती चौक येथील बलशेटवार बुक सेलर्स येथे 15 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी नदीम रावल (7776045556) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

आकर्षक सवलत 

शेती, अध्यात्म, तत्त्वज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान, माहितीपर, अर्थविषयक, पालकत्व, स्पर्धा परीक्षा, वैचारिक, ललित अशा विविध प्रकारची, विविध विषयांवरील पुस्तके आकर्षक 25 टक्के सवलतीत प्रदर्शनात उपलब्ध आहेत. याबरोबरच 1500 रुपयांच्या पुढे पुस्तके खरेदी करणारे वाचक, वाचनालये व अन्य संस्थांसाठी 40 टक्के सवलत दिली जाणार आहे. 

वाचा नामवंत लेखकांना 

या पुस्तक प्रदर्शनात डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जगन्नाथ दीक्षित, शशी थरूर, जयराम रमेश, शिवराज गोर्ले, मंगला गोडबोले या नामवंत लेखकांबरोबरच प्रताप चिपळूणकर, डॉ. प्रशांत नायकवडी, डॉ. नितीन मार्कंडेय, तेजस शेंडे, दिलीपराव देशमुख बारडकर, अशा कृषी तज्ज्ञांच्या पुस्तांचाही सामावेश आहे.

राजकीय व्यवस्था संवेदनशील असायला हवी; तावडेंचा सरकारला टाेला

जय शिवराय! सुर्वेंची तिसरी पिढी जपतेय मर्दानी खेळांची परंपरा

साता-यात पहिले पाढे पंचावन्न; उदयनराजेंची डाेकेदुखी वाढणार?

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Publication Organised Granthmohotsav Shivendraraje Bhosale Satara Marathi News