Sakal Survey : दादा गट भक्‍कम

कार्यकर्त्यांचे बळ आणि भौगोलिक परिस्‍थितीचा विचार करता अजित पवार गट प्रबळ झाल्‍याचे दिसते.
ajit pawar
ajit pawaresakal
Updated on

Sakal Survey - एक खासदार, तीन निवडून आलेले आणि दोन नियुक्त आमदार एवढी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्‍ह्यातील ताकद होती. यापैकी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे हे शरद पवारांसोबत आहेत. तर रामराजे नाईक निंबाळकर, दीपक चव्‍हाण आणि मकरंद पाटील अजित पवार गटात गेले आहेत. लोकप्रतिनिधींच्‍या पातळीवर दोन्‍ही गटांसाठी ही ताकद समसमान वाटत असली,

ajit pawar
Mumbai News : झोपू योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्यासाठी समिती

तरी कार्यकर्त्यांचे बळ आणि भौगोलिक परिस्‍थितीचा विचार करता अजित पवार गट प्रबळ झाल्‍याचे दिसते. राष्ट्रवादीतील या फुटीचा भाजपला पक्षसंघटनावाढीसाठी जिल्ह्यात कितपत लाभ होईल, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे, तरीही लोकसभेची साताऱ्याची जागा निर्विवादपणे आपल्‍याकडे मिळवण्यात त्‍यांनी यश मिळविल्याचे स्‍पष्ट होते.

ajit pawar
Mumbai : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील उपाययोजनेचा बोजवारा; जानेवारी ते जून दरम्यान एकूण ७० अपघातामध्ये ३७ मृत्यू

अजित पवार यांच्या बंडामुळे विधानसभा निवडणुकीतील पक्षीय बलाबलही बदलेल. गेल्या निवडणुकीनुसार जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’चे तीन, भाजपचे दोन, शिवसेनेचे (शिंदे गट) दोन आणि काँग्रेसचा एक आमदार असे बलाबल होते.

विधानसभा निवडणुकीपर्यंत आजची समीकरणे कायम राहिली, तर भाजपच्या दोन जागा कायम राहतील.‘राष्ट्रवादी’च्‍या तीन जागा अजित पवार गट आणि शरद पवार गट यामध्ये विभागल्‍या जातील. शिवसेनेच्‍या कोरेगाव आणि पाटण या दोन जागांसाठी अडचण वाटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com