
लोणंद : सालपे (ता. फलटण) येथे घराच्या वाटणीच्या वादातून तिघा भावांनी संगनमत करून त्यांचे सावत्र भाऊ सावता सरस्वती काळे (वय ७५, रा. सालपे, ता. फलटण) यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून व दगड फेकून मारून खून केल्याची घटना सोमवार सालपे (ता. फलटण) येथे घडली आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. अन्य एकाचा पोलिस शोध घेत आहेत.