

Karad Hero: Youth Jumps into Krishna River to Save Newlywed Woman
Sakal
-सचिन शिंदे
कऱ्हाड: त्याचे मूळ गाव पुणे, तो एका गॅस कंपनीत सिलिंडरच्या वाहनावर चालक. गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करण्यासाठी तो कऱ्हाडला आला होता. त्यावेळी समोरील स्थिती पाहून त्याने क्षणाचाही विचार न करता सुमारे १४० फूट उंच पुलावरून थेट नदीपात्रात उडी मारून नवविवाहितेला वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली. स्थानिक पाच ते सहा युवकांची त्याला मदत झाल्याने त्यांना नवविवाहितेचा जीव वाचविण्यात यश आले. अरुण ज्ञानदेव जाधव (वय ३०) असे या जिगरबाज युवकाचे नाव. जाधवच्या कृष्णा नदीपात्रातील धाडसाचा थरार अनेकांनी आज अनुभवला.