esakal | समर्थांच्या किष्किंधाकांडाचे मुद्रणास साताऱ्यात प्रारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

समर्थांच्या किष्किंधाकांडाचे मुद्रणास साताऱ्यात प्रारंभ

सन 2010 पासून या पोथीबाबत संशोधन केले जात आहे. येथील अतुल चाफेकर यांच्या मुद्रणालयात आता समर्थांच्या वाल्मिकी रामायणातील चौथ्या किष्किंधाकांडाचे मुद्रण करण्यात येत आहे.

समर्थांच्या किष्किंधाकांडाचे मुद्रणास साताऱ्यात प्रारंभ

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : श्री समर्थ रामदास स्वामींनी वयाच्या 14 व्या वर्षी स्वहस्ताने लिहिलेल्या वाल्मिकी रामायणातील किष्किंधाकांडाचे मुद्रण साताऱ्यात करण्यात येत असून या मुद्रणाचा प्रारंभ येथील सुप्रिंट मुद्रणालयात नुकताच उत्साहात करण्यात आला.
 
यावेळी समर्थ वंशज आणि सज्जनगड येथील रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी, भूषण स्वामी आणि मान्यवर उपस्थित होते. समर्थ रामदास स्वामी यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी श्री वाल्मिकी रामायण संस्कृतमध्ये स्वतः लिहिले. त्याच्या मुखपृष्ठावर स्वहस्ताने रामायणातील रेखाचित्रे रेखाटली आहेत. ही मूळ प्रत धुळे येथील वाग्देवता मंदिरात अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवण्यात आली आहे. ही 1820 पानांची पोथी आहे. पोथीच्या शास्त्रशुद्ध संशोधन व संपादनात विद्यावाचस्पती श्री. थिटे, नीलेश जोशी, रूपाली कापरे, उर्मिला अराणके, न्या. आंबादास जोशी यांच्यासह अनेक समर्थ वाड्‌.मय अभ्यासक सहभागी झाले आहेत.

व्वा! मानलं बुवा.. माण तालुक्‍यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून 'हसत खेळत' शिक्षण

सन 2010 पासून या पोथीबाबत संशोधन केले जात आहे. येथील अतुल चाफेकर यांच्या मुद्रणालयात आता समर्थांच्या वाल्मिकी रामायणातील चौथ्या किष्किंधाकांडाचे मुद्रण करण्यात येत आहे. वेदमूर्ती नाटेकरशास्त्री यांच्या उपस्थितीत ग्रंथाचे पूजन करून मुद्रणास प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी योगेशबुवा रामदासी, हर्षवर्धन कुलकर्णी, मनोज पत्की उपस्थित होते. श्री समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर यांनी आभार मानले.

संपादन : सिद्धार्थ लाटकर