सातारा : जिल्हा रुग्णालयात अपुरी संख्या असतानाही पुण्याला पाठविलेले ११ सफाई कर्मचारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय आरोग्य उपसंचालकांनी घेतला आहे. कर्मचारी नसल्यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छतेवर परिणाम होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्वरित हालचाली होऊन कर्मचारी परत पाठवण्यात येणार आहेत.