'त्या' प्रकरणी संजय राठोड दाेषी नाहीत; गृहराज्यमंत्र्यांची क्लिन चीट

'त्या' प्रकरणी संजय राठोड दाेषी नाहीत; गृहराज्यमंत्र्यांची क्लिन चीट

कऱ्हाड (जि. सातारा) : टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर काही दिवस गायब झालेले वनमंत्री संजय राठाेड हे नुकतेच पोहरादेवीला गेले हाेते. त्यावेळी त्यांनी जाेरदार शक्तिप्रदर्शन केले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते असा प्रश्न पत्रकारांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंना केला.

त्यावर देसाई म्हणाले, ""संजय राठोड यांनी गर्दी जमवली असे नाही. ते देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यामुळे तेथे गर्दी झाली. चौकशी केल्यावर कोरोनाचे उल्लंघन झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाला आदेश दिले होते. त्याप्रमाणे तेथे गुन्हे दाखल झाले आहेत. त्या प्रकरणामुळे कोणीही नाराज नाही.'' 

दरम्यान वनमंत्री संजय राठोड यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी कॅबिनेट बैठक आटोपल्यानंतर सुमारे दोन तास चर्चा केली. या भेटी दरम्यान राठोड यांनी तरूणीच्या आत्महत्येशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केला असल्याची चर्चा आहे.

मराठा आरक्षणावरून सरकार आणि प्रशासनात जुंपली ! अशोक चव्हाण यांची आक्रमक भूमिका

धक्कादायक! पोहरादेवीत गर्दी जमवण्यासाठी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांना होतं टार्गेट; गर्दी होती मॅनेज?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com