देशी गाईंविषयी अशीही कृतज्ञता

साबळेवाडीत सप्तधेनू पूजन कार्यक्रम; ग्रामस्थांसह परिसरातील लोकांचा समावेश
Saptadhenu Pujan program for native cows at Sablewadi
Saptadhenu Pujan program for native cows at Sablewadi

ढेबेवाडी - देशी खिलार गाई पालनाला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साबळेवाडी (ता.पाटण) येथील शेतकऱ्यांनी सप्तधेनू पूजन कार्यक्रम केला. भारावलेल्या वातावरणात या सोहळ्यात साबळेवाडीसह परिसरातील शेतकरी महिला-पुरुष व युवक कार्यकर्ते मोठ्या सख्येने सहभागी झाले.

साबळेवाडीत देशी खिलार गाई पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येते. ग्रामस्थांना त्याचे महत्त्‍व पटल्याने गाईंची संख्याही वाढली आहे. धनाजी साबळे यांच्या संकल्पनेतून सप्तधेनू पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात साबळेवाडीसह परिसरातील ग्रामस्थ, युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते. सकाळी गाईंना अंघोळ घालून सजवले. दिवसभरात विष्णू सहस्त्रनाम, गो-प्रदक्षिणा, सामुदायिक नामजप, सचिन महाराज कुंभारगावकर यांचा गो-कथेचा तसेच ग्रामस्थ व महिला मंडळाचा हरिपाठ कार्यक्रम, महाप्रसाद, भजन आदी कार्यक्रम झाले.

यावेळी ग्रामस्थांनी चपाती, भाकरी, पेंड, कणकीचे गोळे, ताजे गवत आदी आवडीचे पदार्थ गाईंना खाऊ घातले. सरपंच निवास साबळे, पोलिस पाटील बाळासाहेब साबळे, धनाजी साबळे, शाहीर आनंद साबळे, सुरेश देसाई, अधिकराव साबळे, संपत साबळे, संजय शेरेकर, महेश साबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. शाहीर आनंद साबळे यांनी आभार मानले. महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com