
सातारा : आगामी मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १५०० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षणे निश्चित करण्यात आली आहेत. त्याचे राजपत्र ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहे. त्यानुसार थेट जनतेतून सरपंच निवडताना किती ग्रामपंचायतींसाठी कोणते आरक्षण असेल, याबाबतची घोषणा या विभागाने केली आहे. यामध्ये मुदत संपणाऱ्या व आगामी काळात निवडणूका होणाऱ्या १५०० ग्रामपंचायतींतील ९२७ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण हे खुले प्रवर्गासाठी असेल. यापैकी ५० टक्के महिलांसाठी राखीव असल्याने ४६४ खुल्या प्रवर्गाच्या महिलांसाठी सरपंचपद आरक्षित असेल. नागरिकांचा मागास प्रवर्गातील ४०५ ग्रामपंचायतीत, अनुसूचित जाती प्रवर्गातील १५४, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील १४ सरपंच असतील.