ऑनलाईन पद्धतीने निधी न काढल्याने 28 कोटी गेले परत

karad
karad
Updated on

सातारा : विशेष घटक योजनेसाठी जिल्ह्याला मिळालेला तब्बल 28 कोटींचा निधी बीडीएसवरून (ऑनलाइन पद्धतीने) काढलाच नाही. त्यामुळे कोरोनात शासनाने विविध योजनांच्या निधी कपात करूनही सातारा जिल्ह्यासाठी आलेला 28 कोटींचा निधी परत गेला आहे. त्यामुळे पालिका व जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून विशेष घटक योजनेतून होणाऱ्या कामांना खो बसणार आहे. 

जिल्ह्यातील पालिका, जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभाग विशेष घटक योजनेतून विविध विकासकामे होतात. प्रत्येक वर्षी विशेष घटक योजनेसाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला निधी उपलब्ध होतो. मात्र, तो अखर्चित राहिल्यास त्याला पुढील वर्षी खर्च करण्यास मुभा असते; पण बीडीएसमधून निधीच काढला नाही तर खर्च कठून करणार हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील पालिकांसाठी सुमारे 14 कोटी, तर जिल्हा परिषदेसाठी 16 कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. हा निधी बीडीएसवर पडून होता. सर्वसाधारणपणे 31 मार्चपर्यंत बीडीएस खुले राहते. त्यादरम्यान हा निधी ऑनलाइन ट्रान्सफर होतो. त्यानंतर यातून विशेष घटक योजनेतून मंजूर केलेल्या कामांवर खर्च केला जातो; पण यावेळेस कोरोनाच्या महामारीमुळे 24 मार्चलाच लॉकडाउन करण्यात आले, तसेच शासनाने कोरोनासाठी उपाययोजना करताना निधी कमी पडू नये म्हणून सर्व योजनांच्या शासकीय निधीत कपात केली, तसेच उपलब्ध निधीतून अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर देण्याची सूचना केली होती. त्यानुसार सातारा जिल्ह्याला विशेष घटक योजनेतून मिळालेला सुमारे 28 कोटी रुपये मिळाले होते. त्यामध्ये पालिकांसाठी 14 कोटी, तर 16 कोटी हे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागासाठी होते. 

कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात झाल्यामुळे शासनाने बीडीएस 31 मार्चऐवजी 27 मार्चलाच बंद केले. त्यामुळे कोषागारात आलेला हा निधी विशेष घटक योजनेसाठी कोणालाही काढता आला नाही. परिणामी तब्बल 28 कोटींचा निधी परत गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विशेष घटक योजनेतून होणाऱ्या कामांवर परिणाम झाला आहे. 

पूर्णवेळ समाजकल्याण अधिकाऱ्याचा अभाव 
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून निधी अखर्चित राहण्याचे प्रमाण मागील दोन ते तीन वर्षांत वाढले आहे. मुळात या विभागाला 18-19 पासून पूर्णवेळ अधिकारी नाही. त्यामुळे ज्या घटकांसाठी या विभागाचे कामकाज होते. त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा फायदा जिल्ह्यातील घटकांना मिळत नाही. त्यामुळे निधी खर्चावरही परिणाम झालेला आहे. जिल्हा परिषदेला पूर्णवेळ समाजकल्याण अधिकारी द्यावा, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहेत; पण अद्यापपर्यंत पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही. 

(संपादन ः संजय साळुंखे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Youth Pratik Kalbhor Dies After 46 Days Following Serious Bengaluru Highway Accident During Medical Treatment
Satara Native Celebrates Ganesh Festival in Nigeria Lagos for 16 Years Keeping Marathi Culture and Ganpati Tradition Alive
Rain Deficit Damages Kharif Crops in Satara Man Khatav and Other Talukas Look to Crop Insurance for Compensation
Farmer Loss Assessment
Marathi News Esakal
www.esakal.com