सातारा : सहा नगरपंचायतींसाठी ७० टक्के मतदान

दुपारनंतर मतदारांच्या रांगा; १९ जानेवारीला होणार मतमोजणी
Voting
VotingSakal media

सातारा : जिल्‍ह्यातील (satara) सहा नगरपंचायतींसाठी आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी ७० टक्के मतदान(voting) झाले. काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्‍याची माहिती पोलिस (police) तसेच निवडणूक यंत्रणेकडून देण्‍यात आली. आज झालेल्‍या मतदानाची १९ जानेवारीला मोजणी (counting)होणार आहे.

Voting
भित्तिशिल्प उद्‌घाटनप्रकरणी साताऱ्यात ३० जणांवर गुन्हा

जिल्‍ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी या नगरपंचायतींच्‍या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया आयोगाने जाहीर केली होती. त्यानुसार निवडणूक प्रकिया टप्‍प्‍याटप्‍याने पार पडल्‍यानंतर सर्वच ठिकाणी प्रचाराचा धुरळा उडला होता. पक्षीयपेक्षा स्‍थानिक आघाडी, गट-तटांमध्‍ये होणाऱ्या या निवडणुकांमुळे स्‍थानिक पातळीवरील वातावरण ढवळून निघाले होते. सहा नगरपंचायतींमधील ७८ जागांसाठी होणाऱ्या सदस्‍यपदाच्‍या निवडणुकीसाठी ११० मतदान केंद्रे उभारण्‍यात आली होती.

आज सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. थंडीचा कडाका जास्‍त असल्‍याने सकाळच्‍या टप्‍प्‍यात मतदान केंद्रांवर मतदाराची तुरळक गर्दी होती. त्यानंतर अकराच्‍या सुमारास सर्वच नगरपंचायतींमधील केंद्रांवर मतदारांच्‍या मतदानासाठी रांगा लागल्‍या होत्‍या. दुपार चारपर्यंत मतदारांच्‍या रांगा ठिकठिकाणी दिसून येत होत्‍या. त्यानंतर अनेक ठिकाणची मतदान केंद्रे मतदारांअभावी ओस पडली होती. सहा नगरपंचायतींच्‍या निवडणुकांसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी ६३ टक्के मतदान झाले होते. शेवटच्‍या अर्धा तासात पुन्‍हा एकदा मतदान केंद्रे मतदारांच्‍या गर्दीमुळे गजबजली होती. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी ७० टक्के मतदान झाल्‍याचा अंदाज निवडणूक यंत्रणेने वर्तवला आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com