पाटणला प्रशासकाच्या कक्षेत 88 ग्रामपंचायती

karad
karad
Updated on

मोरगिरी (जि. सातारा) ः ऑगस्टअखेर पाच वर्षांचा कालावधी संपणाऱ्या पाटण तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक कारभार पाहणार असल्याने संबंधित ग्रामपंचायती आता प्रशासकाच्या कक्षेत आल्या आहेत. 

पाटण तालुक्‍यातील एकूण 107 ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर अखेरपर्यंत संपत आहे. त्यातील 88 ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्टअखेर संपत आहे. सध्या मुदत संपलेल्या 88 ग्रामपंचायतींवर पाटण पंचायत समीतीचे विविध विभागांचे विस्तार अधिकाऱ्यांची शासकीय प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रशासकांच्या नियुक्तीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी गटविकास अधिकाऱ्यांना आदेश दिला होता. त्यानुसार या नियुक्‍त्या केल्या आहेत. 

प्रशासक नियुक्त केलेल्या ग्रामपंचायती ः धावडे, नाणेल, गोषटवाडी, जरेवाडी, टेळेवाडी, मंद्रुळ हवेली, विरेवाडी, कोचरेवाडी, वाघजाईवाडी, कातवडी, केर, सुरूल, मणदुरे, कवरवाडी, काहीर, पाचगणी, आटोली, पेठ शिवापूर, आडदेव, पाठवडे, वजरोशी, मुरूड, कोळेकरवाडी, मस्करवाडी, वाझोली, शिद्रुकवाडी, खळे, काढणे, खोणोली, चव्हाणवाडी, कवडेवाडी, पिंपळोशी, तामकडे, तामिणे, पाळशी, गोकुळ तर्फ पाटण, दुसाळे, बाचोली, निगडे, कसणी, सुपुगडेवाडी, धामणी, करपेवाडी, मानेवाडी, ठोमसे, साखरी, हुंबरळी, कामरगाव, चाफोली, चिटेघर, दिवशी खुर्द, खिवशी, बोंद्री, नाडोली, चोपडी, हावळेवाडी, कोरिवळे, पापर्डे, बोडकेवाडी, नावडी, सोनाईचीवाडी, शिंगणवाडी, केळोली, काळोली, मेंढोशी, मुळगाव, त्रिपुडी, कोकिसरे, डोंगळेवाडी, वाडीकोतावडे, सुळेवाडी, शिंदेवाडी, आंब्रुळे, सोनवडे, नेरळे, आसवलेवाडी, तारळे, मालोशी, जानुगडेवाडी, सळवे, सातर, उमरकांचन, चव्हाणवाडी (धामणी), पवारवाडी, कुठरे, काळगाव, कुंभारगाव आणि वांझोळे. 

आठ गावांचा कारभार एकावरच 
पाटण तालुक्‍यात नेमलेल्या एका प्रशासकाकडे सात ते आठ गावांचा पदभार आहे. त्याचबरोबर त्यांना मूळ कार्यभार सांभाळून संबंधित ग्रामपंचायतींची निवडणूक होईपर्यंतचा कारभार व कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे मूळचे कामकाज व नवीन वाढलेल्या ग्रामपंचायतींच्या कामकाजामुळे संबंधित गावाला न्याय देताना या प्रशासक मंडळींची चांगलीच दमछाक होणार आहे. 

संपादन ः संजय साळुंखे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com