esakal | सातारा: जावली तालुक्यात चंदन चोरी करणारी टोळी गजाआड
sakal

बोलून बातमी शोधा

chandan.jpg

सातारा: जावली तालुक्यात चंदन चोरी करणारी टोळी गजाआड

sakal_logo
By
सुर्यकांत पवार

कास (सातारा) : जावली तालुक्यातील बामणोली भागातील आपटी गावच्या हद्दीत चंदनाच्या झाडांची अवैधरित्या तोड करण्यासाठी आलेल्या टोळीच्या मुसक्या ग्रामस्थांच्या सतर्कतेने मेढा पोलिसांनी आवळल्या.

हेही वाचा: टेंभू योजनेचे बाधित घेणार जलसमाधी; रयत क्रांती संघटनेचा इशारा

याबाबत मेढा पोलिस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, व आपटी गावचे पोलिस पाटील शामराव यशवंत गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी जगंन्नाथ किसन सुतार वय 40 वर्षे रा.जोंगटी ता.पाटण, प्रकाश कृष्णा सपकाळ वय 40 वर्षे रा.नेवकणे आरल ता.पाटण, किरण कृष्णात डुबल वय 23 वर्षे रा.धारेश्वर दिवशी ता.पाटण, आकर लाल हरप्रसाद मकान वय 29 वर्षे मुळ रा.67/09 ग्राम बिरूहली पोस्ट निटरा राज्य मध्य प्रदेश, विरन ग्यानसिंग आदिवासी वय 20 वर्षे रा.कुठे ता.रेठी जि.कठणी रा.मध्य प्रदेश, नरदेश जवाहरलाल आदिवासी वय 22 वर्षे रा.मु.कुठे ता.रेठी जि.कठणी रा.मध्य प्रदेश सध्या सर्व रा.मरळी कारखाना ता.पाटण या सहा जनांच्या टोळक्याला अटक करण्यात आली आहे.

वरील सर्व आरोपी सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास सुमारास आपटी गावच्या हद्दीतील म्हारकी नावाच्या शिवारातील शेतात चंदनाच्या झाडांची तोड करत होते. स्थानिक लोकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा मँक्स कंपनीची गाडी क्र. HM 11 H 8002, तसेच एक हजार पाचशे रुपये किमतीचा एक चंदनाच्या लाकडाचा तोडलेला अंदाजे 2 फुट लांबीचे व सुमारे 11 इंच जाडीचे लाकुड, एक कुऱ्हाड, करवत पाते असा मुद्देमाल जप्त केला आहे.

सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, याबाबतचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गायकवाड करत आहेत.

loading image
go to top