आगाशिवचे मोर पर्यटकांना घालताहेत साद, बिनधास्त वावर वाढला

Satara
Satara

विंग (जि. सातारा)  : येथील आगाशिव डोंगरात मोरांचा बिनधास्त वावर वाढला आहे. कळपाकळपाने दृष्टीस ते पडत आहेत. निसर्गरम्य वातावरणामध्ये दऱ्याखोऱ्यांतून येणाऱ्या त्यांच्या आवाजाची मधुरता पर्यटकांना एक प्रकारे साद घालत आहे. 

आगाशिव डोंगराचे पर्यटनाच्या दृष्टीने अलीकडे महत्त्व वाढू लागले आहे. लॉकडाउनची शिथिलता मिळताच पर्यटकांचा वावर डोंगराकडे वाढला आहे. हिरवाईने नटलेला परिसर उंचावरून न्याहळताना पर्यटकांच्या मनाला वेगळा आनंद मिळतो. ऊन-पावसाचा चमत्कारही पाहायला मिळतो. त्यातच आता मोरांचा बिनधास्त वावर लक्षवेधी ठरतो आहे. कळपाकळपाने ते संचार करत असतात. त्यातच आपला पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोरांचे नयनरम्य दर्शन पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय बनत आहे. मनात आनंद निर्माण करत आहे. त्याच्या आवाजाच्या मधुरतेने दऱ्याखोऱ्यातून नाद घूम दे...या गीताची आठवण मनात सहजच येत आहे. मोरासह अन्य पक्ष्यांचा मुक्त संचारही लक्ष वेधून घेत आहे. वन्यप्राण्यांचा संचार चर्चेचा विषय ठरत आहे. बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांचा त्यात समावेश आहे.

सकाळी-सायंकाळी पर्यटक भेटी तिकडे देत आहे. व्यायामासाठी येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. निसर्गवाटांवरून मोरांचा बिनधास्त वावर मनाला भुरळ घालत आहे. पायथा परिसरात संचार त्याचा अधिक आहे. अगदी जवळून दर्शन घडते आहे. कळपाने दृष्टीस पडत आहेत. आवाजाच्या केकावलीने निसर्गरम्य परिसराला एकप्रकारे साद त्यामुळे मिळत आहे. माणसांच्या वर्दळीत कानी तो गुंजत आहे. लहानग्यांसह आबालवृद्धांचा तो आकर्षणाचा विषय ठरत आहे. मोबाईलवर सेल्फी घेण्याचा मोह कुणाला आवरणार नाही, त्याचा नजारा चित्रबद्ध करण्यासाठी अनेक जण धडपडत आहेत. माथ्यावरून तालुक्‍याच्या विविध परिसराचे दर्शन सहज घडते. कृष्णा-कोयना नदीचा परिसर व कऱ्हाड, मलकापूर शहराचे विलोभनीय दृश्‍य सहज दृष्टीस पडते आहे. 


वन्यजीवांना त्रास देऊ नये 

आगाशिव डोंगर परिसरामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांनी डोंगरातील मोर आदी पक्षी-प्राण्यांना व अन्य वन्यजीवांना त्रास देऊ नये, 
असे आवाहन कऱ्हाड वनविभागाने केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com