
सातारा: राज्यात काही भागांत कृत्रिमरीत्या खत टंचाई निर्माण करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभागाने ३१० खत विक्रेत्यांची तपासणी केली. या वेळी पॉस मशिनचा वापर न करता खतांची प्रत्यक्ष विक्री केल्याचे दिसून आल्यामुळे प्रत्यक्ष व पॉस मशिनवरील खतसाठ्यात तफावत आढळून आली. आतापर्यंत कृषी विभागाने ९ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले असून, उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी दिली.