Ajit Pawar : राज्य अवकाळीच्या संकटात असताना राज्याचे प्रमुख अयोध्या दौऱ्यात रममाण

इथे कोणी ताम्रपट घेऊन आले नसून कोणी मोठ्या बापाचं असले, तरी घाबरू नका, संघर्ष करा. कोणावाचून कोणाच अडत नाही. ऊस जाण्यास त्रास होत असेल तर काळजी करू नका. तो जादा भावाने आपण नेऊ.
Ajit Pawar
Ajit PawarSakal
Summary

इथे कोणी ताम्रपट घेऊन आले नसून कोणी मोठ्या बापाचं असले, तरी घाबरू नका, संघर्ष करा. कोणावाचून कोणाच अडत नाही. ऊस जाण्यास त्रास होत असेल तर काळजी करू नका. तो जादा भावाने आपण नेऊ.

कास - इथे कोणी ताम्रपट घेऊन आले नसून कोणी मोठ्या बापाचं असले, तरी घाबरू नका, संघर्ष करा. कोणावाचून कोणाच अडत नाही. ऊस जाण्यास त्रास होत असेल तर काळजी करू नका. तो जादा भावाने आपण नेऊ. जावळी तालुक्यातील स्थानिक प्रश्न, विशेषतः बोंडारवाडी धरण पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू, असे आश्‍वासन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले.

दरम्यान कोण कोणाला फडतूस म्हणतंय, तर कोण मी काडतूस आहे म्हणतंय, हे महाराष्ट्राच्या भल्याचे नसून सातारा जिल्ह्याला आदर्श विचारांची मोठी परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी आपल्याला चांगले विचार दिले असून, यावरून आपण मार्गक्रमण करत राष्ट्रवादीचा विचार घरोघरी पोचवून जिल्हा पुनः एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

मेढा (ता. जावळी) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा व जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अमित कदम यांच्या पक्ष प्रवेशप्रसंगी ते बोलत होते.

खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे तेजस शिंदे, सारंग पाटील, सांगलीचे वैभव शिंदे, सुभाष शिंदे, बाळासाहेब सोळसकर, शशिकांत वायकर, बाबूराव संकपाळ, प्राचार्य यशवंत पाटणे, राधिका हंकारे, रूपाली भिसे आदी मान्यवर या वेळी प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी अमित कदम यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला.

श्री. पवार पुढे म्हणाले, ‘अमित कदम यांचा पक्ष प्रवेश नसून घरवापसी आहे. त्याचा सर्वांना आनंद असून, तो आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी सार्थकी लावावा. १९९९ ला दोन खासदार व नऊ आमदार असणाऱ्या या जिल्ह्यात आपण आता एक खासदार व तीन आमदार इथपर्यंत आलो आहोत याचा विचार केला पाहिजे. राज्याची तिजोरी हातात असताना जिल्ह्याला आजपर्यंत भरभक्कम निधी दिला. तो लोकप्रतिनिधींकडे बघून नाही तर जनतेकडे बघून.’

राज्यातील महागाई, बेकारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरील लक्ष विचलित करण्यासाठी संभाजीनगरसारख्या घटना घडविल्या जात आहेत का? अशी शंका येते. राज्य अवकाळीच्या संकटात असताना राज्याचे प्रमुख अयोध्या दौऱ्यात रममाण आहेत. कोरोनाचे संकट वाढत असताना राज्य सरकार गंभीर दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

पावसाचे वातावरण पाहून खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘पवार व पाटील व्यासपीठावर एकत्र आले, की पाऊस येतो व हा पाऊस आपल्याला फलदायी असतो. २०२४ मध्ये अशीच सभा घेऊ.’

आमदार शशिकांत शिंदे यांनी ही चार फूट, सहा फूट या वादात आमची उंची मोजू नका, पटात घुसून चीत करू, असा इशारा दिला. तसेच अमित कदम, दीपक पवार व मी एकत्र असून, यापुढे जावळी तालुक्यात एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. अमित कदम यांनी यापुढे कायम राष्ट्रवादी व अजित पवार यांच्यासाठी कार्यरत राहू, असे सांगितले. स्थानिक बोंडारवाडी धरण, पर्यटन विकास, ऊस नेण्याबाबत होत असलेली अडवणूक आदी प्रश्नांबाबत त्यांनी अजितदादा यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पार्टे, नारायण शिंगटे यांनी केले, तर साधू चिकणे यांनी आभार मानले.

अमित कदमांना सल्ला -

अजित पवारांनी भाषणात नेहमीच्या शैलीत कान टोचत अमित कदमांना सल्ला दिला. ते म्हणाले, ‘राजकारणात गडबड करायची नसते, श्रद्धा व सबुरी महत्त्वाची असते. अमितने गडबड करायला पाहिजे नव्हती. एकमेकांच्या पायात पाय घालून पाडू नका, महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक वज्रमूठ करा.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com