मलकापूरात ऑक्‍सिजन पुरवणारा सूरज ठरतोय देवदूत

karad
karad

कऱ्हाड (जि. सातारा) ः मलकापूरला कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. शासकीय पातळीवर त्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. मात्र, रुग्णांच्या दारात ऑक्‍सिजन घेऊन जाणारा एक जण देवदूत ठरत आहे. सूरज शेवाळे असे त्याचे नाव. कृष्णा उद्योग समूहाने त्याला दिलेल्या पोर्टेबल ऑक्‍सिजन किटव्दारे त्याने अनेकांना जीवदान दिले आहे. कोरोनामध्ये श्‍वसनाचा त्रास होणाऱ्या, धाप लागणाऱ्यांसाठी सूरज हा थेट ऑक्‍सिजन घेऊन दारात पोचत आहे. 

श्‍वसनाचा त्रास होत असलेल्या कोरोनाग्रस्ताला काल मध्यरात्रीही सूरजच्या धाडसाने जीवदान मिळाले. कोरोना विरोधात लढाईत अनेक जण जिवावर उदार होऊन लढत आहेत. अशा वातावरणातच काल रात्री मलकापूर येथे घरी उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्ताला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. त्यावेळी ऑक्‍सिजनची तातडीची गरज होती. त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धडपड सुरू झाली. त्यावेळी त्यांना कृष्णा उद्योग समूहाचे ऑक्‍सिजन मशिन असल्याचे समजले. त्यांनी अतुल भोसले यांचे निकटवर्तीय आगाशिवनगरचे सूरज शेवाळे यांना फोन केला. रात्रीचे 11 वाजून गेले होते. त्याचवेळी सूरज हा ऑक्‍सिजन मशिनसह दारात आले. त्यांनी क्षणाचा विलंब न लावता रुग्णाला ऑक्‍सिजन दिला. वेळेत व अत्यंत धाडसाने शेवाळे यांनी माणूस म्हणून कर्तव्य पार पाडले. त्यांची मशिन लावतानाची धडपड पाहून रुग्णाचे कुटुंबियही हळहळले. श्री. शेवाळे हे राजकीय पदाधिकारी असूनही त्यांनी सामाजिक बांधिलकीतून केलेल्या रुग्णसेवेचे परिसरात कौतुक होत आहे. मलकापुरात ग्राउंडवर काम करण्यासाठी शेवाळे व त्यांचे सहकारी झटत आहेत. त्यांना अतुल भोसले, विनायक भोसले यांचे पाठबळ आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने ऑक्‍सिजन देण्यासाठी धावलेल्या सूरजचे सध्या कौतुक होत आहे. 

संपादन ः संजय साळुंखे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com