सत्तेत नसतानाही करुन दाखवलं, आता पुढची रणनीतीही ठरली : शिवेंद्रसिंहराजे

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 8 September 2020

हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यासाठी सहकार्य करणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील या तिघांचेही आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी सातारकरांच्यावतीने आभार मानले आहेत.

सातारा : पालिकेच्या निवडणूकीत नगरविकास आघाडीच्यावतीने सातारा शहराची हद्दवाढ मंजूर करुन घेणार असा शब्द सातारकरांना दिला होता. तो शब्द खरा करुन दाखवला आहे असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी स्पष्ट केले. आगामी काळात सातारा शहरातील आैदयाेगिक वसाहतीसाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे आमदार भाेसले यांनी नमूद केले.

सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत होता. शहराची हद्दवाढ झाल्यास शहरालगतच्या उपनगरे आणि त्रिशंकू भागांच्या विकासाला चालना मिळेल. सातारा शहराचा आणि आसपासच्या परिसराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सोयी- सुविधा मिळण्यासाठी हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर होणे अत्यावश्यक होते. त्यासाठीच सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अभ्यासपुर्ण पाठपुरावा करणार्‍या शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नांना यश लाभले आहे. मुंबई येथे सुरु असलेल्या अधिवेशनात सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव त्यांनी मंजूर करुन घेतला. त्याबाबतची अधिसूचना आज (मंगळवार) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आमदार भाेसले यांनी स्विकारली.

नेत्यांनाे! आता हाताची घडी सोडायची वेळ आलीय 

दरम्यान साताराची हद्दवाढ झाल्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असून शहरासह त्रिशंकू भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आणि सातारकरांसाठी अत्यावश्यक असणारा प्रश्‍न मार्गी लागल्याने सातारकर आणि उपनगरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे. शहरातील माेती चाैक येथे नगरविकास आघाडीच्या नगरसेवक, नगरसेविकांनी नागरिकांना कंदी पेढे वाटले. 

दिलेला शब्द पाळला...

'या' जिल्हा बॅंकेची राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी; तब्बल ९७ टक्के कर्जवसुली!

सातारा पालिकेच्या निवडणूकीत नगरविकास आघाडीच्यावतीने सातारा शहराची हद्दवाढ मंजूर करुन घेणार असा शब्द सातारकरांना दिला होता. तो शब्द खरा करुन दाखवला. सातारा पालिकेत आघाडीची सत्ता नसतानाही शहराच्या विकासकामांकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. साताराकरांचे सर्व प्रश्‍न सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले. पालिकेत सत्ता नसतानाही शहराच्या हद्दवाढीचा प्रश्‍न निकाली काढला असून सातारकरांना दिलेला शब्द पाळल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी नमूद केले.

शिवेंद्रसिंहराजेंनी मागताच अजित पवारांकडून श्री गणेशा, सातारा जिल्ह्यातील या मोठ्या प्रकल्पासाठी 57 कोटी मंजूर

पुढचे लक्ष एमआयडीसी...

सातारा जिल्हा बॅंकेत युपीआय सेवा

आगामी काळात औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी मोठ मोठे उद्योगधंदे, कंपन्या सातार्‍यात येण्यासाठी प्रयत्न करणार तसेच देगांव, निगडी एमआयडीसी सुरु करुन रोजगार निर्मीतीला चालना देणार असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.

शिवेंद्रसिंहराजे अजित पवारांना भेटले; साताऱ्याची हद्दवाढ घेऊन आले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivendrasinghraje Bhosale Assures For Development Of MIDC Satara News