वाई तालुक्‍यात चिंतेचे वातावरण

कोरोना
कोरोना
Updated on

वाई (जि. सातारा) : पसरणी येथील संबंधित मृत व्यक्ती 28 मे रोजी दादर (मुंबई) येथून पत्नी, मुलगी व जावई यांच्यासह खासगी गाडीने आपल्या गावी आले होते. त्यांना गावाबाहेर कोरोना सेंटरमध्ये क्वारंटाइन केले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांची मुलगी व जावई मुंबईला परत निघून गेले. संबंधित व्यक्तीस उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. शनिवारी (ता. सहा) दुपारी एकच्या सुमारास त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर संशयित म्हणून कोविड निकषांनुसार ग्रामीण रुग्णालयात स्वॅब घेऊन त्यांच्यावर वाई स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पहाटेपासूनच गावात शुकशुकाट होता.

कोरोना समितीने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या असून, संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. सकाळपासूनच गावात ये- जा करणाऱ्यांवर समितीच्या वतीने कारवाई करण्यात येत होती. गावातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले असून, दुपारी पाचच्या सुमारास प्रशासनाच्या वतीने तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव यांनी माहिती घेऊन सूचना केल्या. गावातील बाधित क्षेत्राच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्‍यक सेवा घरपोच देण्याच्या, तसेच येथील व्यक्तींनी कुठल्याही कारणास्तव बाहेर न पडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

मृत व्यक्तीचा अहवाल आल्यानंतर रात्री उशिरा त्यांची पत्नी व मुलास वाई येथे संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान सह्याद्रीच्या डोंगर पठारावर असलेल्या येरुळी व डुईचीवाडी पाठोपाठ लगतच्या सोमेश्वरवाडीतील 68 वर्षांची एक महिला कोरोना बाधित आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता 
पसरणीतील मृत व्यक्तीची पत्नी जरी क्वारंटाइन असली, तरी संबंधित व्यक्तीचा मुलगा गावात राहात होता. तो कोरोना समितीने दिलेल्या सूचनांना धाब्यावर बसवून आई-वडिलांच्या निकट, तसेच गावातील अनेकांच्या संपर्कात आला असल्याने त्यांची झोप उडाली आहे. जवळपास 18 व्यक्‍ती त्याच्या निकटच्या सहवासित असल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com