सातारा : बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन भरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा : बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन भरणार

सातारा : बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन भरणार

सातारा : महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबरपासून सुरवात झाली आहे. उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दोन डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्यात मुदत असून, त्यानंतर १३ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसंदर्भात ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थ्यांसाठी तीन डिसेंबर ते ११ डिसेंबरपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. या विद्यार्थ्यांना २० डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करण्यास मुदत आहे, तसेच उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करून शुल्क भरण्यासाठी १२ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

हेही वाचा: दिल्लीत लॉकडाऊनची तयारी, 'आप' सरकारची कोर्टात माहिती

"पुढील वर्षी होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरणे बंधनकारक आहे. याबाबत, शासनाने परिपत्रक काढून माहिती दिली आहे."

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

loading image
go to top