सातारा : बनावट चेक देत गंडा घालणारा अटकेत

विविध पोलिस ठाण्यांतील २१ गुन्‍हे उघड; स्‍थानिक गुन्‍हे शाखेची कारवाई
 fake checks
fake checks esakal

सातारा : बनावट चेक देत लॅपटॉप, मोबाईलसह इतर महागड्या वस्‍तू खरेदी करत गंडा घालणाऱ्या विश्रृत भालचंद्र नवाथे (रा. शनिवार पेठ, सातारा) याला स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने अटक केली. अटकेतील नवाथे याच्‍यावर सातारा, पुणे, सांगली, मुंबई येथील विविध पोलिस ठाण्‍यांत फसवणुकीचे २१ गुन्‍हे दाखल आहेत.

सातारा शहरातील एका दुकानात काल दुपारी एक तरुण आला होता. या दुकानातून तो तरुण महागड्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तू खरेदी करत होता. घेतलेल्‍या वस्तूंपोटी तो संबंधित दुकानदारास चेक देणार होता. एक युवक दुकानदारांना गंडा घालण्‍याच्‍या तयारीत असल्‍याची माहिती नंतर स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकास मिळाली. यानुसार त्‍याठिकाणी सहा‍यक निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक अमित पाटील, अंमलदार उत्तम दबडे, कांतिलाल नवघणे, विश्‍‍वनाथ संपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, दीपाली यादव, अमोल माने, मुनीर मुल्‍ला, शिवाजी भिसे, प्रवीण पवार, पृथ्‍वीराज जाधव, प्रीती पोतेकर यांनी त्‍या युवकास पोवई नाका येथून ताब्‍यात घेतले.

ताब्‍यात घेतलेला युवक विश्रृत भालचंद्र नवाथे हा असल्‍याचे चौकशीत समोर आले. नवाथे याच्‍यावर कोरेगाव, सातारा शहर, शाहूपुरी, पुण्‍यातील निगडी, पौंड, चतु:श्रुंगी, शिवाजीनगर, कोथरुड, खडकी, सासवड, तसेच मुंबईतील दादर पोलिस ठाण्‍यात फसवणुकीचे २१ गुन्‍हे दाखल असल्‍याचे समोर आले. तीन वर्षांपूर्वी न्‍यायालयीन कोठडीत असताना नवाथे याने बंदोबस्‍तावरील पोलिस कर्मचाऱ्यांना गुंगारा देत पळ काढला होता. कारवाईत सहभागी झालेल्‍या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्‍सल, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com