

Berlin Marathon 2026 Satara Athlete Yash Muchandi Completes 42195 Kilometres in 3 Hours 28 Minutes 57 Seconds
sakal
सातारा: बर्लिन येथे झालेल्या बीएमडब्ल्यू बर्लिन मॅरेथॉन या जागतिक दर्जाच्या मॅरेथॉन स्पर्धेत येथील यश मुचंडी याने तीन तास २८ मिनिटे ५७ सेकंदांत पूर्ण करून उज्ज्वल यश मिळविले. बर्लिन मॅरेथॉन ही जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि वेगवान मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक मानली जाते. या स्पर्धेत जगभरातील हजारो धावपटू सहभागी होतात. जागतिक मॅरेथॉन स्पर्धेच्या मालिकेत आता बर्लिनसह टोकियो, बॉस्टन, लंडन, शिकागो, न्यूयॉर्क, सिडनी आणि केपटाऊन अशा आठ जागतिक मॅरेथॉनचा समावेश आहे. बर्लिन पूर्ण केल्यानंतर उर्वरित सात जागतिक मॅरेथॉन मेजर्स पूर्ण करून देशाचे आणि साताऱ्याचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा यशचा उद्देश आहे.