

Folk Aakhyan Begins Late but Wins Hearts of Satara Audience
Sakal
-राहुल लव्हाळे
छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपादिवशी जल्लोषी सातारकरांनी आपल्या संयम अन् रसिकतेच्या अनोख्या संगमाची प्रचिती देत, संमेलनच काय? कोणताही नवा उपक्रम आम्ही भरभरून प्रतिसादात यशस्वी करू शकतो, याचा वस्तुपाठही इतरांपुढे सादर केला. फोक आख्यानाचा कार्यक्रम रात्री नऊचा नियोजित असताना तो सुरू व्हायला थोडाथोडका नव्हे, तर तासाभराचा विलंब झाला; परंतु उपस्थित २० हजारांवर रसिकांनी अशाही स्थितीत संयम राखला, तो वाखाणण्याजोगाच...