सातारा : पवार यांना भेटण्यास बळिराजा संघटनेस मनाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

सातारा : पवार यांना भेटण्यास बळिराजा संघटनेस मनाई

sakal_logo
By
(शब्दांकन - सचिन शिंदे)

सातारा (कऱ्हाड) ः ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या अभिवादनास आलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्यास आलेल्या बळिराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी भेटून दिले नाही. पोलिसांनी केलेल्या अडवणुकीचा बळिराजा संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी निषेध केला.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बळिराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्यास आले होते. त्यांना भेटायचे होते. मात्र, पोलिसांनी भेटून दिले नाही. त्याबद्दल बळिराजा शेतकरी संघटनेतर्फे प्रशासनाचा निषेध करण्यात आला. शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात आहेत. अतिवृष्टी शेतकरी पुरता अडचणीत असताना सरकारने दीडशे रुपये प्रतिगुंठा मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

हेही वाचा: ST Strike: कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या सकाळी भूमिका स्पष्ट करणार - खोत

एकीकडे शेती पंपाची वीज कनेक्शन बंद करण्याचे आदेश सरकारने महावितरणला दिले आहेत. दुसरीकडे अतिवृष्टीत तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची चेष्टाच केली आहे. शेतीपंपाचा विद्युतपुरवठा खंडित करायच्या आदेशाने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशी स्थिती असताना शेतकऱ्यांची होणारी अडवणूक निषेध करावी, अशीच आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार ५० हजार अनुदान देणार होते. त्याबाबत आम्ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करणार होतो. एकरकमी एफआरपीच्याही प्रश्नावर चर्चा होणार होती. पोलिसांकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्याची वेळ मागितली मात्र, पोलिसांनी भेट नाकारली, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मुल्ला यांनी दिली.

loading image
go to top