ST Strike: कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या सकाळी भूमिका स्पष्ट करणार - सदाभाऊ खोत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sadabhau khot

ST Strike: "कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या सकाळी भूमिका स्पष्ट करु"

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्य शासनानं एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा यासाठी त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ म्हणून सरकारसोबत चर्चेला गेले नेते सदाभाऊ खोत आणि भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी आझाद मैदानात जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या सकाळपर्यंत कर्मचाऱ्यांची भूमिका जाहीर करु, अशी माहिती दिली.

हेही वाचा: ST Strike: कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या सकाळी भूमिका स्पष्ट करणार - खोत

खोत म्हणाले, "सरकारनं जो निर्णय जाहीर केला तो आम्ही ऐकला यानंतर आता कर्मचाऱ्यांसोबत बसून आम्ही त्यावर चर्चा करु. त्यासाठी रात्रभर आम्ही आझाद मैदानातच थांबणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. सरकारच्या या निर्णयावर आम्ही सर्व बाजूंनी साधकबाधक विचार करु आणि उद्या सकाळी आम्ही आमचा निर्णय जाहीर करु"

हेही वाचा: एसटीचं उत्पन्न वाढल्यास कर्मचाऱ्यांना इन्सेन्टिव्ह; सरकारची घोषणा

आम्ही अद्याप कामगारांची भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांच्याशी चर्चेनंतरच त्यावरची भूमिका उद्या स्पष्ट केली जाईल. अनिल परब यांनी पगारवाढ ऐतिहासिक असल्याचं म्हटलं असलं तरी त्यांनी सांगितलेल्या आकडेवारीबाबत आम्ही आमच्या काही वरिष्ठ कामगारांना सोबत घेऊन चर्चा करु. आज आझाद मैदानात आम्ही काही प्रमुख कामगारांशी चर्चा करुन त्यानंतर विविध विभागांमध्ये जे कामगार काम करत आहेत. त्यांच्याशीही आम्ही संपर्क करणार आहोत, यानंतर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर उद्या सकाळी निर्णय जाहीर करु, असंही सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले.

loading image
go to top