Kirit Somaiya
esakal
सातारा : जिल्ह्यात बांगलादेशींची (Bangladeshi) घुसखोरी वाढली असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा भाजपचे नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी व्यक्त केली. महाबळेश्वर येथील हॉटेल व्यवसायिकांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामांची तपासणी महसूल विभागाने सुरू केली आहे. लवकरच अशा बेकायदेशीर मालमत्तांवर कारवाई होणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.