

BJP Candidate Selection in Satara Hits Snag; Intense Discussions Continue
Sakal
सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे अंतिम ठरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची दिवसभर येथील हॉटेल फर्नमध्ये खलबते सुरू होती. त्यातून सातारा तालुका वगळता, बहुतांश ठिकाणचे उमेदवार निश्चित होऊन त्यांना उद्या (बुधवार) पक्षाकडून एबी फॉर्म दिले जाणार आहेत. रात्री उशिरापर्यंत साताऱ्यातील जागांबाबत निर्णय न झाल्याने चर्चेचे घोडे अडून राहिले.