esakal | काय सांगता! चक्क विहिरी पेट्रोल- डिझेलने भरल्या; शेतकरी चिंतेत
sakal

बोलून बातमी शोधा

काय सांगता! चक्क विहिरी पेट्रोल- डिझेलने भरल्या; शेतकरी चिंतेत

हिंदूस्थान पेट्राेलीयम कार्पेारेशन लि. लाेणी पुणे यांचे जाणारे अंतर्गत पेट्राेलीयम पदार्थचाे पाईपलाईनीस हाेल पाडून पेट्राेलची चाेरी करण्याचा प्रयत्न केला. त्यात दाेन हजार लिटर पेट्राेल शेजारील ज्वारीचे शेतात गेले.

काय सांगता! चक्क विहिरी पेट्रोल- डिझेलने भरल्या; शेतकरी चिंतेत

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : एकीकडे पेट्राेल डिझेलचे (Petrol) दर गगनाला भिडले आहेत आणि दूसरीकडे चक्क विहिरी पेट्राेल आणि डिझेलने भरुन वाहू लागल्याचे चित्र सासवड (ता. फलटण) येथे दिसत आहे. ज्या ठिकाणी पाण्यासाठी वणवण फिरावे लागते त्याच ठिकाणी विहिरी इंधनाने भरल्याने ग्रामस्थांचे डाेळे पांढरे झाले. दरम्यान एका कंपनीची उच्चदाब पेट्राेल वाहिनीतून इंधनाची चाेरी झाल्याची नाेंद लाेणंद पाेलिसांत झालेली आहे.

मुंबई -पुणे -सोलापूरला जाणाऱ्या एका कंपनीच्या पेट्रोल - डिझेल वाहिनीतून इंधन चोरीचा प्रयत्न करताना संबंधित वाहिनीस छिद्र पडले त्यामुळे सासवड परिसरातील शेतं आणि विहिरी या पेट्रोल डिझेलने भरून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान या प्रकारामुळे काही शेतातील पाणी दुषित होऊन पिके जळाली आहेत.

मुंबई- पुणे -सोलापूर अशी एका कंपनीची उच्चदाब पेट्रोल वाहिनी जमिनीखालून सासवड गावच्या हद्दीतून गेली आहे. सासवड ते घाडगेवाडी रस्ता या ठिकाणी 300 फूटांवर एका शिवारात पेट्रोलची मोठ्या प्रमाणात गळती होऊ लागल्याने संबधित कंपनीचे अधिकारी, लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी घटनास्थळास भेट दिली. त्यावेळी चोरट्यांनी नियोजनबद्धरित्या वाहिनी फोडल्याचे दिसून आले. यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली. हे सर्व चित्र पाहिल्यानंतर या भागात एक अग्नीशमक दलाची गाडी बाेलाविण्यात आली. त्यानंतर एका विहिरीतून पाणी मिश्रीत पेट्रोल टँकर भरण्याचे काम सुरू करण्यात आले. 

सासवड परिसरात पेट्रोलची दुर्गधी येत असून शेतकरी भयभयीत झाले आहेत. संबधित कंपनीने पेट्रोल पाईप लाईन तातडीने बंद केली. पंरतू पाईपलाईन मधील पेट्रोलची तीन दिवस गळती सुरु होती. हे पेट्रोल कंपनीने टँकरव्दारे भरून नेण्याचे काम दोन दिवसांपासून सुरु आहे. विहीरीत उतरलेले पेट्रोल टँकरमध्ये भरण्याचे काम आजही सुरू आहे. हजारो लिटर पेट्रोल वाया गेल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

दरम्यान याबाबत हिंदूस्थान पेट्राेलीयम कार्पेारेशन लि. लाेणी पुणे यांचे जाणारे अंतर्गत पेट्राेलीयम पदार्थचाे पाईपलाईनीस हाेल पाडून पेट्राेलची चाेरी करण्याचा प्रयत्न केला. त्यात दाेन हजार लिटर पेट्राेल शेजारील ज्वारीचे शेतात तसेच पेट्राेलीयम व खनिज पाईपालाईन अधिनीयम 2011 चे कलम (2) उल्लंघन केले आहे. त्यानूसार अज्ञातावर गुन्हा दाखल केल्याची माहिती लाेणंद पाेलिस ठाण्यातून देण्यात आली.

कऱ्हाडकरांनाे! जाणून घ्या अर्थसंकल्पातील जनशक्तीची उपसूचना

सुप्रिया सुळेंनी करुन दाखवलं, आपणही पुढाकार घ्या! शिवेंद्रसिंहराजेंची साद

अपहरण प्रकरणी सेनेच्या नेत्यावर गुन्हा दाखल

FasTag : आनेवाडी टोलनाक्‍यानजीक वाहनधारकांची खुलेआम लूट

मैदानावर अन्‌ मैदानाबाहेरही परिस्थितीशी दोन हात करत बाळू वाढवतोय देशाचा नावलौकिक

Edited By : Siddharth Latkar