गजा मारणेच्या अटकेनंतर सातारा पोलिसांची पंजाबात दबंगगिरी; पोलिस अधीक्षक म्हणाले, ''दॅटस् ग्रेट हम यही सुनना चाहते थे''!

गजा मारणेच्या अटकेनंतर सातारा पोलिसांची पंजाबात दबंगगिरी; पोलिस अधीक्षक म्हणाले, ''दॅटस् ग्रेट हम यही सुनना चाहते थे''!

सातारा : भुईंज (ता. सातारा) येथे युवकाचा खून करून मृतदेह स्मशानभूमीत जाळल्याच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार व सराईत गुन्हेगार बंटी जाधवसह तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) भटिंडा (पंजाब) येथून अटक केली. सलग दोन महिने संशयितांचा माग काढत राजस्थान, हरियाना व पंजाब राज्यात पाठलाग करत एलसीबीच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली आहे. पुण्यातील फरार गुंड गजा मारणे यास सातारा पाेलिसांनी शनिवारी (ता. 27) मेढ्यात अटक केल्यानंतर आठवडा उलटत नाही ताेच पंजाबला जाऊन सातारा पाेलिसांनी फरार गुंड बंटीला अटक केल्याने  पाेलिसांचे येथे काैतुक हाेत आहे. 
 
गुंड बंटी जाधव यास अटक केल्याची माहिती साताऱ्यात पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली. भुईंजच्या गुन्ह्यामध्ये अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव (वय 24, रा. भुईंज, ता. वाई), निखिल शिवाजी मोरे (वय 24, रा. फुलेनगर भुईंज, ता. वाई) यांना, तर उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात मयूर महादेव साळुंखे (वय 35, रा. कालगाव, ता. कऱ्हाड) याला अटक करण्यात आली.

घरा घरांत मना मनांत पाेचविणा-या नेत्यावरच झाली गेम 
 
चार जानेवारीला आसले (ता. वाई) येथील ओंकार कैलास चव्हाण (वय 30, मूळ रा. करंदी, ता. जावळी) या बेपत्ता युवकाच्या तपासात भुईंज येथील युवकांनी खून करून त्याचा मृतदेह स्मशानभूमीत जाळल्याची माहिती समोर आली. सुरवातीला या गुन्ह्यात एलसीबीने चौघांना अटक केली होती. या गुन्ह्यात एकूण 18 संशयित निष्पन्न झाले होते. त्यातील 13 जणांना आतापर्यंत पकडण्यात पोलिसांना यश आले होते; परंतु मुख्य सूत्रधार बंटी जाधव हा पसार झाला होता. दरम्यानच्या काळात या गुन्ह्याला मोकाही लावण्यात आला. बंटीला पकडण्यासाठी श्री. बन्सल व अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर अधीक्षकांनी सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार केले होते. गेले दोन महिने सातत्याने हे पथक तांत्रिक तपास व बातमीदारांच्या संपर्कातून संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न करत होते.

पाेलिसांनी पकडल्यानंतर गजा मारणे म्हणाला, फक्त दोनच दिवस राहिले होते
 
या दरम्यान संशयित देशाबाहेर नेपाळलाही गेल्याचे समोर आले. त्यानंतर ते राजस्थानमध्ये असल्याची माहिती समोर आली. श्री. गर्जे, हवालदार शरद बेबले, प्रवीण फडतरे, सचिन सासणे, रोहित निकम यांचे पथक राजस्थानला पोचेपर्यंत संशयित तेथून पसार झाले होते. या पथकाने त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. हरियानामार्गे ते पंजाबमध्ये गेल्याचे समोर आले. भटिंडा (पंजाब) येथील हॉटेलमध्ये तीनही संशयितांना पकडण्यात आले.  सलग पाच दिवस राजस्थान, हरियाना व पंजाब राज्यांत अहोरात्र तपास करून संशयितांना अटक केल्याबद्दल पोलिस अधीक्षकांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यांना स्वत: बक्षीस देणार असल्याबरोबरच पोलिस महासंचालकांकडेही प्रस्ताव पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

बंटी जाधववर तब्बल 15 गुन्हे 

बंटी जाधव हा सराईत गुन्हेगार आहे. खुनाच्या गुन्ह्यासह, खुनाचा प्रयत्न, आर्मऍक्‍ट अशा विविध कलमांसह त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात तब्बल 15 गुन्हे दाखल असल्याचे अधीक्षक बन्सल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

सातारा पाेलिसांची दबंग कामगिरी

गुंड गजा मारणेबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिस दल अलर्ट केले होते. फरारी असणाऱ्या मारणेचा पाेलिसांना शोध सुरू केला होता. फरारी असणारा मारणे साथीदारांसमवेत मेढा भागात असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली हाेती. त्यानूसार शनिवारी (ता. 27 फेब्रुवारी) सातारा पोलिसांनी जावळी तालुक्‍यातील मेढा परिसरातून मारणेला अटक केली हाेती. त्यापाठाेपाठ पंजाबमध्ये जाऊन सातारा पाेलिसांनी गुंड बंटी जाधव यास अटक केली. या कामगिरीमुळे पाेलिसांचे काैतुक हाेत आहे.

नाशिकला निघालेल्या सांगलीच्या व्यापा-यांचा पुणे-बंगळूर महामार्गावर अपघात; दोघे ठार

पोलिस ठाण्यासमोरील वडाच्या झाडावर कार आदळली; पुण्यातील चिमुकली ठार 

वासोटा मार्गे नागेश्वरला निघालात? थांबा! त्यापुर्वी हे वाचा 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com