Satara St Bus Stand
Satara St Bus Standsakal

Satara ST Bus Stand : सातारा बसस्थानकाचे रुप पालटणार

सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तब्बल साठ वर्षे जुन्या बसस्थानकाची पुनर्बांधणी लवकरच होणार.
Published on

सातारा - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तब्बल साठ वर्षे जुन्या बसस्थानकाची पुनर्बांधणी लवकरच होणार आहे. पुढील दोन महिन्यांत एसटी बसस्थानकाचे बांधकाम सुरू होणार असून, नव्या रचनेत १८ ते २० प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत. त्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. नव्याने बस स्थानक उभारल्यानंतर प्रवाशांची वाढती कोंडी कमी होणार आहे.

जुने बसस्थानक पाडल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात एसटी बसला ये- जा करण्यासाठी प्रशासनाने शहरातील तीन जागांचा पर्याय निवडला असून, लवकरच जागा अंतिम होणार आहे. दरम्यान, साताऱ्यातील मुख्य बस स्थानकालगत असणाऱ्या विभागीय वर्कशॉपही नव्याने उभारण्यात येणार असून, त्यासाठी १८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पाच ठिकाणी बस स्टॅंडचेही नूतनीकरण होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com