तुम्ही मुंबईवरुन कऱ्हाडला येताय? मग ही बातमी अवश्य वाचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शासकीय यंत्रणेने शेंडेवाडीत धाव घेऊन आवश्‍यक उपाय योजना हाती घेत कारचालक व त्याच्या निकट सहवासातील दहा जणांना तळमावल्याच्या विलगीकरण कक्षात दाखल केले.

ढेबेवाडी (जि.सातारा) : ई -पास (रीतसर) पास न घेता मुंबईहून गावी आलेल्या शेंडेवाडी (कुंभारगाव, ता. पाटण) येथील कारचालकावर येथील पोलिसांनी गुन्हा दाखल करून कार जप्त केली. या मोटारीतून प्रवास केलेले तेथीलच चौघे जण कोरोना बाधित आढळल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीतून बिगरपास प्रवासाचा प्रकार समोर आला.
 
याबाबत पोलिसांची माहिती अशी, संबंधित कारचा मालक काही दिवसांपूर्वीच रीतसर पास घेऊन गावाहून मुंबईस गेला होता. मात्र, तिकडून गावाकडे परतताना त्यांनी प्रवासाचा रीतसर पास न घेता शेंडेवाडीतील एकाच कुटुंबातील अन्य चौघांना सोबत घेऊन प्रवास केला. काल सकाळी कऱ्हाडमध्ये पोचल्यावर कारमधील चौघे जण कऱ्हाडला उतरले, तर संबंधित कारचालक शेंडेवाडीस गेला. कऱ्हाडमध्ये उतरलेल्या चौघांनी सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर तेथून कृष्णा रुग्णालयात जाऊन घशातील स्रावाचे नमुने तपासणीस दिले होते.
Video : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चाखले माेदींचे पेढे

त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शासकीय यंत्रणेने शेंडेवाडीत धाव घेऊन आवश्‍यक उपाय योजना हाती घेत कारचालक व त्याच्या निकट सहवासातील दहा जणांना तळमावल्याच्या विलगीकरण कक्षात दाखल केले. त्यादरम्यान करण्यात आलेल्या चौकशीतून बिगर पास प्रवासाचा प्रकार समोर आल्याने कारवाई केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले.

शासनाने राज्यात प्रवासासाठी ई - पास अनिवार्य केला आहे. प्रवाशांनी त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हा पाेलीस दलाने केले आहे.

राज्यातील प्रवासासाठी' हे' आवश्यक : गृहमंत्री अनिल देशमुख

साताऱ्यातील 'या' गणेशाेत्सव मंडळाने कोराेनाच्या लढ्यासाठी दिले एक लाख 11 हजार 111 रुपये 

ब्रेकिंग : सातारा जिल्ह्यात 'या' तालुक्यातील काेराेना बाधिताचा मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Case Registered Against Citizen In Dhebhewadi For Violating Rules About E Pass