Satara : शेतकरी संघटनांनी घातले मुख्यमंत्र्यांना साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath shinde

Satara : शेतकरी संघटनांनी घातले मुख्यमंत्र्यांना साकडे

कराड : मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सर्व शेतकरी संघटनेच्यावतीने प्रमुख कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी कराड विमानतळावर भेट घेतली. बळीराजाचे पंजाबराव पाटील चंद्रकांत यादव विश्वास जाधव उत्तम खबाले किशोर पाटील सागर कांबळे स्वाभिमानीचे देवानंद पाटील रामचंद्र साळुंखे दादासो यादव प्रमोद जगदाळे बापूसो साळुंखे रयत क्रांतीचे सचिन नलावडे उपस्थित होते मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांच्या शेती पंपाला दिवसा दहा तास वीज द्यावी त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यावरील गुन्हे सरकारने काढून घ्यावे.

महा विकासआघाडी सरकारने एफआरपी चे दोन तुकडे करण्याचा कायदा केलेला आहे तो कायदा रद्द करावा. दोन साखर कारखान्यामधील हवाई अंतराची अट रद्द करावी. शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान तात्काळ शेतकऱ्यांना द्यावे अशा विविध मागण्यावरती मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.