

Satara City Bus Service Gets Green Signal 10 Mini Electric Buses Ordered After Sakal Campaign Know Proposed Routes
sakal
-राजेश सोळसकर
सातारा : सातारकरांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ‘सिटी बस’सेवेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘सकाळ’ने याप्रश्नी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, साताऱ्यासाठी दहा मिनी ई-बस (इलेक्ट्रिक बस) उपलब्ध करण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी परिवहनमंत्र्यांशी याबाबत यशस्वी चर्चा केली असून, लवकरच साताऱ्यात एसटी महामंडळामार्फत ई-बस धावणार असल्याची माहिती स्वतः शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.